Posts

Image
                               बाबासाहेब मुस्लिमद्वेष्टे होते का ?                                                                                                                                                     - नौशाद उस्मान, औरंगाबाद  आपला बहुसंख्य भारतीय समाज हा महामानवांचं दैवतीकरण करणारा समाज आहे. त्यामुळे सहसा देशाचं राजकारणदेखील त्यांचं नाव घेऊन किंवा त्यांच्या जन्मभुमी, जन्मतारीख, त्यांचं स्मारक या भावनिक बाबींभोवतीच घुटमळत असते. विकासाभिमुख राजकारणाचा कुणी गाजावाजा जरी केला तरी शेवटी हा फटाफट खुर्ची मिळवण्याचा फंडाच यशस्वी होत असल्याचं नुकत्याच झालेल्या युपी निवडणुकीतून निष्पन्न झालंय. एका महामानवाच्या नावाने राजकारण करतांना त्या महामानवाभोवती फवत काही विशिष्ट लोकांचंच वलय कायम राहिल याचीही काळजी घेतली जाते. यातून अनेकवेळा दोन समाजात तेढ वाढून दंगली घडवल्या जातात. गुजरात नरसंहार आणि त्यातून उदयास आलेलं एक उन्मादी राजकारण याचं ज्वलंत उदाहरण आहे.  गुजरात नरसंहारात निरपराध मुस्लिम समाजावर अत्याचार करण्यासाठी दलित व आदिवासी समाजाचा मोठ््या पमाणात वापर करण्यात आल