बाबासाहेब मुस्लिमद्वेष्टे होते का ?

                                                       
                                                                                            - नौशाद उस्मान, औरंगाबाद 
आपला बहुसंख्य भारतीय समाज हा महामानवांचं दैवतीकरण
करणारा समाज आहे. त्यामुळे सहसा देशाचं राजकारणदेखील त्यांचं नाव घेऊन किंवा त्यांच्या जन्मभुमी, जन्मतारीख, त्यांचं स्मारक या भावनिक बाबींभोवतीच घुटमळत असते. विकासाभिमुख राजकारणाचा कुणी गाजावाजा जरी केला तरी शेवटी हा फटाफट खुर्ची मिळवण्याचा फंडाच यशस्वी होत असल्याचं नुकत्याच झालेल्या युपी निवडणुकीतून निष्पन्न झालंय. एका महामानवाच्या नावाने राजकारण करतांना त्या महामानवाभोवती फवत काही विशिष्ट लोकांचंच वलय कायम राहिल याचीही काळजी घेतली जाते. यातून अनेकवेळा दोन समाजात तेढ वाढून दंगली घडवल्या जातात. गुजरात नरसंहार आणि त्यातून उदयास आलेलं एक उन्मादी राजकारण याचं ज्वलंत उदाहरण आहे. 
गुजरात नरसंहारात निरपराध मुस्लिम समाजावर अत्याचार करण्यासाठी दलित व आदिवासी समाजाचा मोठ््या पमाणात वापर करण्यात आला. याची अनेक समाजशासतरीय कारण आहेत. त्यापैकी सर्वात मोठं कारण म्हणजे या मुस्लिम व या मागास समाजात संपर्कअभावामुळे वाढलेला दुरावा. हा दुरावा निर्माण करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरषांच्या विचारांचं ब्राहमणीकरण करुन मुस्लिमविरोधी वातावरण निर्मितीचादेखील फार मोठा वाटा होता. हा फंडा यशस्वी झाल्यापासून काही स्वयंघोषित दलित नेत्यांना पुढं करुन डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा झपाट््याने विपर्यास्त सुर आहे. याविषयी भा.ल. भोळे माहिती देतात की, ‘‘आंबेडकरांच्या विपुल लेखनातून काही सुटी वावये, त्यांच्या विचारांच्या गाभ्यापासून तोडून, जनतेसमोर ठेवण्याचा उपदव्याप संघपरिवारातील अभ्यस्त व अनभ्यस्त दोघेही नेटाने करत असतात.'' (संदर्भ: डॉ. आंबेडकरांचे मुस्लिमविषयक विचार' या पुस्तकाची प्रस्तावना) आजकाल सोशल मीडियावर तर या अपप्रचाराने कहर केला आहे. यासाठी सर्वात जास्त बाबासाहेबांच्या ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ या पुस्तकाचा वापर होतोय. त्यामुळे विकासाचा मुद्दा बाजुलाच राहून दलित, आदिवासींचे मुद्देही बाजुला पडतात. म्हणून यात नुकसान फवत मुस्लिमांचच नव्हे तर इतर बहुजन जनतेचंदेखील आहे. 
म्हणून या अपप्रचाराचं खंडण होणे अगत्याचं ठरते. डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी ‘‘डॉ. आंबेडकरांचे मुस्लिमविषयक विचार’’ या अभ्यासपूर्ण पुस्तकाद्वारे अतिशय नि:पक्षपातीपणे खंडण केलंय. आपण या ब्लॉगद्वारे एका-एका अपप्रचाराची उकल करुन वस्तुस्थिती तपासून पाहू या.

क्रमशः
(इतर मजकूर लवकरच प्रसिद्ध केला जाईल)

Comments

  1. डॉ. आंबेडकरांचे मुस्लिमविषयक विचार (डॉ. आनंद तेलतुंबडे ) ही पुस्तकं ऑनलाईन खरेदी करता येते का??? असल्यास कृपया लिंक द्या !!! किंवा कुठे मिळणार???

    ReplyDelete
    Replies
    1. sugawa prakashan,
      562, Sadashiv Peth,
      Pune - 30.

      Delete

Post a Comment